Top News

धाडसी जिगरबाज युवकांचा आदिवासी काँग्रेस कमिटी तर्फे सन्मान


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

पांढरकवडा : विद्येचे माहेर घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे येथील सदाशिव पेठेतील विद्यार्थिनीवर कोयता हल्ला प्रकरणातील बचाव करणाऱ्या पांढरकवडा येथील आदर्श सोसायटीत राहणाऱ्या एमपीएससी (MPSC) अभ्यासक्रम करणारा पुणे येथील विद्यार्थी दिनेश मडावी यांनी आपल्या जीवाची परवा न करता विद्यार्थिनीवर कोयत्याचा वार करणाऱ्या त्या माथफेरूचा तो वार वरच्यावर झेलून कोयत्याची मुठ दिनेश मडावीच्या कपाळाला लागली आणि तरुणीचा वार हुंकवला.

जिगरबाज दिनेश मडावी, लेशपाल जवळंगे, हर्षद पाटील, यांच्या सहकार्याने तरुणीचा जीव वाचून जीवनदान दिले व समृद्धी महामार्ग बुलढाणा जवळील भीषण अपघातात ट्रॅव्हल्स सह 25 जणांचा जळून राख झाली. या अपघातात जिगरबाज शशिकांत गजबे ह मु आदर्श कॉलनी पांढरकवडा, जिल्हा यवतमाळ पोलीस शिपाई, वर्धा पोलीस अधीक्षक कार्यालय, तीन व्यक्तींना सुखरूप ट्रॅव्हल्स काचा फोडून बाहेर काढले व जिवनदान दिले. या धाडसी कार्याची दखल अखिल भारतीय आदिवासी काँग्रेस कमिटी जिल्हा यवतमाळ च्या वतीने गोटूल इंग्लिश मीडियम स्कूल पांढरकवडा येथे कौतुकाची थाप म्हणून जिगरबाज दोन्हीही युवकांचा सन्मान समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

सत्कारमूर्ती दिनेश मडावी व शशिकांत गजबे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी जनसेवक वामनराव सिडाम, प्रमुख पाहुणे अमर पाटील, अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी वाणी तोडासे,  प्रसिद्धीप्रमुख आदिवासी काँग्रेस कमिटी बिसनसिंग शिंदो, अध्यक्ष तालुका युवक काँग्रेस सामाजिक कार्यकर्ते विष्णू राठोड, अखिल कोठारे, मकरंद साने, हेमलता मरापे, भावना दर्शनवार, वनिता मोघे, सिमा येडमे, पुनम गेडाम, प्रज्ञा तोडसाम, वैशाली येडमे, दुर्गा मेश्राम, वैष्णवी जळके, माया वरगटवार, व फ्रेंड्स क्लब चे प्रशिक्षक देवघरे सर यांची उपस्थिती होती.

या चारही नायकांना महाराष्ट्र सरकारने गृह विभागामध्ये पोलीस निरीक्षक शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करावा मा. राष्ट्रपती व मुख्यमंत्री यांच्याकडे निवड करावी, यासाठी पाठपुरावा करेल असे मत व्यक्त केले.
-भाऊराव मरापे सर
अध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी काँग्रेस कमिटी जिल्हा यवतमाळ
Previous Post Next Post