टॉप बातम्या

मौजा करंजखेड, कासारबेहळ व सेवानगर येथे ई-पीक पाहणी


सह्याद्री चौफेर | नंदकुमार मस्के 

महागांव : शेतकरी स्वत:हून त्यांच्या शेतातल्या पिकांची नोंद करू शकणार आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारच्या कृषी आणि महसूल विभागानं गेल्या वर्षीपासून ई-पीक पाहणी नावाचा प्रकल्प सुरू केला आहे. यंदा खरीप हंगामातल्या पिकांची नोंद सातबाऱ्यावर करण्यासाठी कासारबेहळ येथे ई पीक पाहणी उपक्रम राबविण्यात येत आहे.

राज्य शासनाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प ई-पीक पाहणी अंतर्गत "मीच मांडणार माझा पिक पेरा" करंजखेड, सेवानगर, कासारबेहळ येथील शेतकऱ्यांनी पीक पाहणी करण्याकरिता मौजे कासारबेहळ येथे मंडळ अधिकारी महागाव राम पंडित व तलाठी अनिल खडसे यांनी गावातील शेतकरी खातेदारांना माहिती दिली व प्रात्यक्षिक करून दाखविले.
यावेळी गावातील पोलिस पाटील, करंजखेड येथिल पोलिस पाटील रावसाहेब ठाकरे, अशोकराव करे, राजाराम ठाकरे, विष्णू जाधव, उपसरपंच प्रमोद पिटलेवाढ, बसूजी पावडे, राजु पाटील, नंदकुमार मस्के, माधव करे, रोहन मस्के, बालाजी बिचकुले, प्रसाद करे हे शेतकरी उपस्थित होते.
खरीप हंगाम २०२३ पीक पाहणी नोंदणीसाठी ई-पीक पाहणीचे २.०.११ हे अपडेटेड व्हर्जन गूगल प्ले स्टोअर वर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. खरीप हंगामाच्या प्रत्यक्ष ई-पीक पाहणी मोबाईल ॲप व्दारे पीक पाहणी करण्यासाठी ०१ जुलै २०२३ पासून सुरु झाली आहे.
तरी सर्व शेतकरी बंधु-भगिनींना अवाहन करण्यात आले की, दरम्यान,खरीप हंगामा २०२३ साठी दिलेल्या कालावधीमध्ये आपली ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण करावी जेणे करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यास अडचण येणार नाही.
Previous Post Next Post