सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : तालुक्यातील एका चार मुलींच्या पित्याचा अपघाती निधन झाल्याची घटना रविवारला सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास नागपूर हैद्राबाद राज्य महामार्गावरील पिंपरी नजीक घडली. सदर घटनेने घोडदरा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृतक रवी भाऊराव राऊत (41) रा घोडदरा हे काल 18 जुन रोजी घोडदरा येथुन चार वाजताच्या दरम्यान, मुलींची तब्येत दाखविण्याकरीता सेवाग्राम येथे निघाले असता रस्त्यातच रवि राऊत यांची दुचाकी आदळून अपघाती निधन झाले, ही दुःखद घटना रविवारला सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास नागपूर- हैदराबाद महामार्गावरील पिंपरी (जि.वर्धा) येथे घडली.
मृतक रवि यांचे पाठीमागे आई,वडील,पत्नी व चार मुली असा बराच मोठा आप्त परिवार आहे.