सह्याद्री चौफेर | राजू डावे
सनी तिरूपती कन्नुरवार (२३) रा जैताई नगर, गायकवाड फैल,वणी असे आत्महत्या केलेल्या मृतकाचे नाव आहे. तो आज सोमवारला सकाळी घरून बाहेर गेले असता, दुपारी त्यांचे नातेवाईकांना मोबाईल ध्वनी वरून महिती मिळाली की, सनी याने वणी-घुग्गुस मार्गांवरील निलगिरी बनात एका मोहाच्या झाडाला दुपट्टयाच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी माहिती मिळताच नातेवाईकासह मृतकाचे आई वडील घटनास्थळी पोहोचले. दरम्यान सनी हा मोहाचे झाडाला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत दिसून आला असून, याबाबत वणी पोलिसांना माहिती देण्यात दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
सनी यांच्या पश्चात आई वडील असा आप्त परिवार आहे. सदर घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, त्याने आत्महत्या का? केली अशी विविधांगी चर्चा घटनास्थळावर चर्चील्या जात होती. या घटनेचा अधिक तपास वणी पोलीस करित आहे.