येत्या पाच दिवसात सर्व मागण्यापूर्ण करा... अन्यथा उपोषणास बसू


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : शेतक-यांचे आर्थिक तसेच मानसीक खच्चीकरण करण्यास महावितरण कंपनी तथा येथील अधिकारी कर्मचारी कारणीभुत ठरत असल्यामुळे आम्ही सर्व शेतकरी येत्या पाच दिवसात उपोषणास बसू जर आमच्या मागण्या पुर्ण मंजूर झाल्या नाही तर.. अशा आशयाचे निवेदन उपकार्यकारी अभियंता यांना केगांव मार्डी ए जी (AG) ग्राहकांनी दिले. 

तालुक्यातील केगांव मार्डी ए जी (AG) ग्राहकांना महावितरण कंपनीकडून भेडसावत असलेल्या समस्या ह्या शेतकरी व ग्राहकांना आर्थिक तसेच मानसीक खच्चीकरण करण्यास कारणीभूत ठरत असल्याने मार्डी परिसरामधील ग्राहकांनी तात्काळ मागण्या मंजूर करून त्वरित समस्याचे निराकरण करावे अशी आग्रही मागणी निवेदनातून केली आहे. दिलेल्या निवेदनावर गजानन मत्ते, जयंत देऊळकर, उदय खिरटकर यांच्या सह्या आहेत.

केगाव AG वरील मागण्या खालीलप्रमाणे.

केगाव AG वरील लोड रिलीफ मिळावा, केगांव AG वरील लाईनस्टॉप मध्ये वाढ करावी, केगाव AG वरील झाडे कटाई करावी, केगांव AG वरील वाकलेली, झुकलेली सर्व पोल दुरूस्ती करून घ्यावी, कैगांव AG वरील सर्व डी.बी. स्टक्चर ए.बि.स्विच लावुन घेण्यात यावी, केगाव AG वरील सर्व वितरण बाक्सची दुरूस्ती करण्याबाबत, तसेच ग्रामीण शाखेचे प्रमुख फोन न उचलण्याबाबत व त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. 

वरील सर्व मागण्या अत्यंत महत्वाच्या असुन, त्यामुळे शेतक-यांचे आर्थिक तसेच मानसीक खच्चीकरण करण्यास कारणीभुत ठरत आहे. या मागण्याकडे लक्ष घालुन त्या पुर्ण करण्यात याव्या, अन्यथा पुढील पाच दिवसात सर्व शेतकरी उपोषण करू असा सज्जड दम मार्डी सर्कल मधील शेतकऱ्यांनी दिला.

आता या समस्यांच्या बाबतीत म रा वि वि कं. मर्या. मारेगाव किती गंभीर आहे याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.