Page

मारेगाव शहरात एका व्यक्तीचा आढळला मृतदेह

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : यवतमाळ राज्य महामार्गावरील लोढा हॉस्पिटल जवळ गुरुवार दिनांक 22 जून रोजी महामार्गाच्या कडेला असलेल्या काटेरी झूडूपात एका इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. या मृतदेहाचे अंदाजे वय 40 च्या आसपास असून अती मद्य सेवणाने त्याचा मृत्यू झाला असावा असा कयास व्यक्त होत आहे.

महामार्गवरील रस्त्याच्या कडेला एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. हा इसम तालुक्यातील अर्जुनीचा पंजाबराव आत्राम असल्याचे समजते.

या घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, इसमाचा मृतदेह दोन दिवसापासून असल्याचा अंदाज व्यक्त होत असून सदर घटनेचा अधिक तपास पोलीस करित आहे.