बेंबळा कालव्याचे निकृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कंत्राटदारावर फौजदारी गुन्हे कायमकरण्यासाठी मनसेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : सध्या कालव्याचे सुरु असलेले बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे होत असल्यामुळे मारेगाव तालुक्यातील कालवा फुटल्याच्या अनेक वेळा तक्रारी असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे बेंबळा कालव्याचे निकृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कंत्राटदारावर फौजदारी गुन्हे कायम करण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना मारेगाव शाखेच्या वतीने करण्यात आली.

पावसाळा सुरू झालाय. त्यामुळे कोणत्याही क्षणी मुसळधार पावसाने कालवे फुटुन शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. सध्या तालुक्यात सुरु असलेल्या बेंबळा कालव्याची कामे निकृष्ट दर्जाची होत आहे. या कामावर माती मिश्रीत रेतीचा वापर होत आहे. परिणामी मागील वर्षी कालवे फुटुन शेतकऱ्यांचे अतोनाथ नुकसान झाले, त्याची पुनरावृत्ती यावर्षी होवु नये, यासाठी होत असलेली निकृष्ट कामे थांबवुन झालेल्या कामाची गुणवत्ता तपासणी विभागाकडून तपासणी होऊन ती कामे दर्जेदार करण्यात यावी व जी निकृष्ट दर्जाची करण्यात आली. त्या अभियंता, कंत्राटदार यांचे विरोधात फौजदारी गुन्हे कायम करण्यात यावी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष भाऊ रोगे यांच्या नेतृत्वात मारेगाव तहसीलदार निलावाड यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना करण्यात आली.

 निवेदन देतांना शशिकांत बोढे, भास्कर गुहे, प्रतिभा तातेड, बेबी आत्राम, शेख नबी शेख, बेबी नंदुलाल आत्राम, किशोर मानकर, विलास गानफाडे, जमीर सैय्यद, सुरज नागोसे, अनिल पारखी, चाँद बहादे, सुनिल आत्राम, सुभाष टेकाम यासह असंख्य मनसैनिक उपस्थित होते.
Previous Post Next Post