Page

सभापती, उपसभापती पदाचा आज फैसला

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : सन 2023-28 या पाच वर्षाच्या कालावधी करीता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांची निवडणूक पार पडल्यानंतर परंपरेने कांग्रेस कडे सत्ता स्थापणेसाठी बहूमताचा आकडा प्राप्त झाला असला तरी सभापती, उपसभापतीच्या अविरोध निवडी बाबत अनिश्चिता कायम आहे. त्यामुळे आज होणाऱ्या या निवडणुकीत बहुरंगी लढतीचे चित्र दिसून येत आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुक मैदानात पहिल्यांदाच तीन तुल्यबळ नेत्याची एन्ट्री झाल्यामुळे बहूरंगी चूरशीचे चित्र निर्माण झाले आहे.अशा परिस्थित कोणाला थांबवायचे आणि कोणाला हिरवी झेंडी दाखवायची हे पक्ष श्रेष्टी समोर पेच निर्माण झाला असल्यामुळे जो बहुमताचा आकडा पार करेल तोच सभापती पदाचा दावेदार असेल असा सुतोवाच मिळाल्याने बहुमताचा आकडा जुळवा जुळवसाठी काल दिवसभर इच्छुकाची दमछाक झाली आहे. पक्षश्रेष्टीनी कोण्या एका नावावर शिक्का मोर्तब केला नसल्याने इच्छुकांनी सर्वच संचालकांच्या भेटी गाठी घेत आपली भूमिका समजवून सांगण्यात दिवस घालवला आहे. या कालावधीत इच्छुका कडून नेत्या ऐवजी आता संचालकाची मनधरणी सुरु करण्यात आली होती.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, पदासाठी बहूरंगी लढत झाल्यास 6 संचालकाचा आकडा प्राप्त करणारा उमेदवार त्या पदाचा मानकरी ठरू शकतो. सद्याच्या परिस्थिती मध्ये शिवसेनेचे चार संचालक असून तिरंगी मुळे त्यांच्या भूमिकेला महत्व प्राप्त झाले आहे. ते ऐनवेळी कोणती खेळी करतील ते निकाला नंतर उघड होणार आहे. एकूण 18 संचालक या निवडणुकीत मतदार आहेत. या मध्ये 4 शिवसेना 1 भाजपा 13 कांग्रेस चा समावेश आहे. कांग्रेसचे तीन उमेदवार या निवडणूक रिंगणात उभे राहील्यास तिघांच्या मताची विभागणी होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थिती मध्ये शिवसेनेचे चार आणि भाजपचा एक दोघांची युती झाल्यास हा आकडा 5 होउन काग्रेसला या पदा पासून दूर राहण्याची वेळ येऊ शकते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

सेना, भाजपा मध्येच सभापती, उपसभपतीची वाटघाटी होऊन बहुमताच्या कंग्रेसला सहकार क्षेत्रात मोठी चपराक बसू शकेल अशी परिस्थिती आहे. काल दिवसभराच्या घडामोडीत जुळवाजुळव मध्ये कोणाची सरशी ठरली आजच्या फैसल्या नंतर उघड होणार आहे.