टॉप बातम्या

कळंब : आज सावरगाव येथे हवामान तज्ञ पंजाबराव डख मार्गदर्शन करणार

सह्याद्री चौफेर | रुस्तम शेख 

कळंब : तालुक्यातील सावरगाव येथे २० मे २०२३ रोज शनिवारला सकाळी १०-०० वाजता जिल्हा परिषद शाळेत खरीप हंगामाच्या पूर्व तयारी अनुषंगाने कापूस सोयाबीन व खरिपातील अन्य पिकाचे नियोजन करण्याकरीता व पावसाची स्थिती तो अंदाज या वर्षी करण्यात येणारी पिकाची लागवड या अनुषंगाने आ. डॉ.अशोकजी उईके यांच्या अध्यक्षतेखाली तसेच माजी मंत्री राजाभाऊ ठाकरे, माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.  

याप्रसंगी यंदाची पावसाची स्थिती, कशी राहील,पेरणी कधी करावी, पिकाची देखभाल कशी करावी इ कृषि विषयक मार्गदर्शन हवामान तज्ञ तथा अभ्यासक पंजाबराव डख करणार आहे.

 येणाऱ्या खरीप हंगामातील सोयाबीन पिका बाबत हेमंत डिके, कापूस पिका करीता डॉ. एन व्ही कायदे तर गुलाबी बोंड अळी, खत व्यवस्थापन बाबत डॉ प्रमोद यादगिलवार इत्यादी तज्ञ मान्यवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे.

तरी शेतकरी बांधवांनी उपस्थित राहून शेतकरी मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी शुभ्रकांत भगत, निलेश भोयर कृषी अधिकारी पंचायत समिती कळंब यांनी केले आहे.
Previous Post Next Post