सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : येथील तरुणाने निर्गूडा नदी च्या पात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार (11 एप्रिल) रोजी सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. त्याच्या अशा जाण्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
विनोद भादीकर (36) रा शास्त्री नगर असे मृतकाचे नाव आहे. विनोद हा एक चांगला व्हाॅलीबाॅल खेळाडू होता. मागील काही दिवसांपासून आजारी असल्याने मानसिक विवंचनेत राहायचा, आज मंगळवार रोजी सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान, तो निर्गुडा नदी वरील पुलावर बसुन असतांना त्याने नदी पात्रात उडी घेतली असता, वणी-मकुटबन या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना दिसताच त्यांनी वणी पोलिसांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले तसेच वणी नगरपरिषदे बचाव पथक प्रमुख भोलेश्वर ताराचंद यांनी सहकार्यासोबत रेस्कु करून अवघ्या विस मिनीटात शोध घेतला. परंतु तो पर्यंत उशीर झाल्याने मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढून उत्तरीय तपासणीकरिता वणी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.
विनोद ने टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास वणी पोलिस करीत आहे.