सह्याद्री चौफेर : वृत्तसंस्था
मारेगाव : नागपूर येथून एक दुःखद बातमी समोर आली आहे. एका 34 वर्षीय तरुण कामगाराचा ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अचानक हृदय-विकाराचा झटका येऊन तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे मारेगावात शोककळा पसरली. मृतक राजेश आनंद सरवर रा.इंदिरा नगर (मारेगाव रोड) असे तरुणाचे नाव असे आहे.
मारेगाव येथील राजेश आनंद सरवर वय वर्ष 34,सध्या नागपूर स्थित पाणी पुरवठा विभाग (महानगरपालिका नागपूर) येथे कंत्राटी कर्मचारी म्हणून असलेल्या या तरुणाला बुधवारी दि. 12 एप्रिल रोजी सकाळी 8 च्या दरम्यान, राजेशला अचानक हृदयविकाराचा झटका आला. यात त्याचा मृत्यू झाला, नागपूर येथील रुग्णालयात शवविच्छेदन करुन सायंकाळी मारेगाव या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. अशी माहिती त्यांचे निकटवर्ती्यांनी दिली
राजेश हा धष्टपुष्ट होता, तसेच नागपूर येथे पाणी पुरवठा विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत होता, शिवाय राजेश याचा विवाह अवघ्या 7 ते 8 महिन्यापूर्वी झाला होता. या घटनेने मारेगाव (रोड) शहरात हळहळ व्यक्त होत आहे.