टॉप बातम्या

29 एप्रिलला वणी येथे जाहीर व्याख्यान...

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच तर्फे "सिम्बॉल ऑफ नॉलेज" भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्रपाल गौतम, माजी मंत्री, दिल्ली सरकार, हे उपस्थित राहणार असून ते भारतीय संविधान व भारतीय समाजा पुढील आव्हाने या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तर प्रमुख अतिथी प्रा. डॉ. इसादास भडके, आंबेडकरी विचारवंत चंद्रपूर, प्रा. डॉ. सागर जाधव, 'वामनदादा कर्डक' साहित्याचे गाढे अभ्यासक, यवतमाळ. प्रा. डॉ. माधव सरकुंडे, पुरोगामी विचारवंत, यवतमाळ यांचीही उपस्थिती लाभणार आहेत.
शनिवार दि. 29 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता एस.बि.लॉन. वरोरा रोड (वणी) येथे आयोजित केले आहे. तरी होणाऱ्या या व्याख्यानाच्या कार्यक्रमाला शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे, आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच यांनी केले आहे.
Previous Post Next Post