सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : शहरातील सर्वोदय चौक येथे वास्तव्यास असलेल्या एका 74 वर्षीय इसमाने आपल्या राहते घरी दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज 11 मार्च रोजी सकाळी साडेचार वाजताच्या दरम्यान, उघडकीस आली.
संतोष मारोती बोरूले रा सर्वोदय चौक, वणी असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. संतोष बोरूले हे कुटुंबासोबत सर्वोदय चौक येथे राहतात. आज सकाळी त्यांचा मुलगा पेपर वाटण्यासाठी साडेचार वाजता दरम्यान, उठला व किचनमध्ये गेला असता त्याला वडील संतोष बोरूले हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. ही माहिती नातेवाईकांना दिली. त्यानंतर नातेवाईकांनी पोलिस स्टेशन गाठून याबाबतची माहिती दिली असता वणी पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रूग्णालयात दाखल केला.
संतोष यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून पुढील तपास वणी पोलिस करीत आहेत.