सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
या रॅलीद्वारे हेल्मेटचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. आज गुरुवारी दि.२३ मार्च रोजी वाहतूक नियंत्रण उपशाखा वणी शाखा यांच्या द्वारा "मोटारसायकल चालवीतांना हेल्मेटचा वापर करावा" असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी हेल्मेटची गरज काय? याबद्दल रॅली जनजागृती च्या माध्यमातून देण्यात आली. शासनाने दुचाकी चालकांसाठी हेल्मेट आणि चारचाकी चालकांसाठी सीटबेल्ट बंधनकारक केले आहे. पण, वाहन चालकांकडून याबाबी दुर्लक्षित केल्या जातात. आयोजकांच्या म्हणण्यानुसार, तरूणांमध्ये हेल्मेट वापरण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे त्यांना हेल्मेटचे महत्त्व समजावे यासाठी ही रॅली काढण्यात आली.
सदर रॅलीला मा उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवली. सदर टीडीआरएफ (TDRF) मुख्य क्षेत्रीय अधिकारी मुस्कान सय्यद, व त्यांची टीम, लोकमान्य महाविद्यालयाचे एनसि सि प्रमुख प्राध्यापक किसन घोगरे, व विद्यार्थी, एन एस एस प्रमुख प्राध्यापक निलिमा दवणे मॅडम व त्यांची चमू, सुशगंगा पॉलीटेक्निक चे विद्यार्थी, सेवानिवृत्त शिक्षक दीनानाथजी आत्राम, शहरातील नागरिक व पत्रकार बंधू, तसेच वाहतूक नियंत्रण उपशाखेचे पोलीस अंमलदार यांच्या उपस्थितीमध्ये शासकीय मैदान पाण्याच्या टाकी प्रवेशद्वारापासून रॅली निघाली. टिळक चौक, खाती चौक, गांधी चौक, सर्वोदय चौक, टागोर चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, साई मंदीर चौक, वाहतूक नियंत्रण उपशाखा असे करत वणी शाखामध्ये रॅलीचा समारोप झाला.