टॉप बातम्या

पंचनामे तात्काळ पूर्ण करा – स्वामी लोहराळकर

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

नांदेड  : जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे व्यवस्थित व काळजीपूर्वक करा. नुकसान भरपाईपासून एकही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी अंकुर सेवा संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा स्वामी लोहराळकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून आज आग्रही मागणी केली.

नांदेड जिल्ह्यातील काही भागासह तालुक्यात गुरुवार व शुक्रवारदरम्यान (दि. 17 व 18 मार्च) अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील शेती व शेतमालाचे नुकसान झाले आहे. दोन दिवसात जिल्ह्यात सरासरी पेक्षा पाऊस पडला. तसेच नांदेड तालुक्यात शेतीचे मोठे नुकसान झाले. त्यात गहू, हरभरा, केळी पीकाचे नुकसान झाल्याचा वृत्त आहे. भोकर येथील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी केली. यावेळी जिल्हा प्रशासनाला त्वरित कार्यवाही करण्याची सूचना दिली. जिल्हा प्रशासनामार्फत नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करुन पंचनामा करण्याची कार्यवाही सुरु आहे.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार या शेतकऱ्याच्या शेतातील गहू हरभरा व केळी फळपीकाची पाहणी केली. शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यात येईल. एकही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. त्यांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच येथील अन्य शेतकऱ्यांच्या शेतातील पीकांचीही पाहणी केली. पण 31 मार्च जवळ येत असल्यामुळे बँकेचे कर्ज शेतकऱ्यांना भरणे शक्य नसल्याने शासनाने त्वरित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक अनुदान देण्यात यावे अशी प्रसिद्धी पत्रकातून लोहराळकर यांची मागणी आहे.
Previous Post Next Post