Top News

वणीकरांना दूषित पाण्याचा पुरवठा

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : वणीकरांना दूषित पाण्याचा प्रवाह होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून नागरिकांनी या घाण पाण्याची तक्रारी घेवून मुख्याधिकारी यांच्या दालनात महिला धडकल्या. पालिकेने तातडीने शुद्ध पाणीपुरवठा करावा व शहरवासियांचे धोक्यात आलेले आरोग्य दूषित पाण्यापासून होणारी हानी टाळावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

पिण्याच्या पाणी मागील तीन महिन्यापासून दूषित पाणी येत आहे. या पाण्याने आरोग्य धोक्यात आले. नागरिकांनी आमदार यांच्याशी भेट घेवून समस्या मांडल्या, मात्र मुख्याधिकारी, कंत्राटदार नागरिकांच्या समस्यांचे निराकरण न करता दुर्लक्ष करित असल्याची  कैफियत मांडली. 

शहरालगत निर्गुडा नदी व वर्धा नदीवर स्वतंत्र पाणी पुरवठा योजना व संपूर्ण शहरांत 22 बोरवेल जिवंत असतांना वणी शहरवासियांना तीन दिवसाआड पाणी पुरवठा म्हणजे वर्षातून केवळ तीन महिने पाणी पुरवठा केला जात आहे. जनतेकडून मात्र, वार्षिक कर वसुल केल्या जाते, पाण्याच्या टाक्या दरमहा साफ केल्या जात नाही, कोणत्याही पाण्याच्या टाकीवर सुरक्षा रक्षक नाही. ही बाब वणीकरांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळे या सर्व बाबीची चौकशी करून जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या मुख्याधिकारी यांचेवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना करण्यात आली आहे.
सदर निवेदनाच्या प्रती तहसीलदार तथा प्रशासक वणी नगर परिषद यांना देण्यात आले आहे. यावेळी राजु तुराणकर, मंगल भोंगळे, सुदाम गावंडे, महेश पाहपळे, शुभांगी सपाट, ललिता वाडस्कर, ज्योती कापसे, गीता तुराणकर, कुंदा नांदे, साधना तुराणकर, जोस्त्ना सुरपाम, तुळसा नगराळे, विद्या वानखेडे, सिमा खोब्रागडे, सविता ताजने, संजीवनी मोहितकर, सुरेखा डोंगे, सुरेखा बोधे, ज्योति नगराळे, सुनीता संजय चार्लेकर, सुरेखा झाडे, बल्की ताई, ताई पेटकर, सविता ठाकरे, ज्योति तुराणकर, पुजा ढाले, रजनी ताजने, माला प्रभाकर, कमळ झाडे, सुरेखा चिट्टलवार, संगीता हेपट, मिनाक्षी मजगवळी यासह असंख्य महिला उपस्थित होत्या.
Previous Post Next Post