अर्जुना बिट मधे रात्री लागली भीषण आग,वनसंपदेचे मोठ्याप्रमाणात हानी


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : यवतमाळ नजीकच असलेल्या मनदेव जंगलात भीषण आग लागल्याची माहिती वनविभागाचे मणपुर राऊंड चे वणपाल सुनील लोहकरे आणि मनपुर गावातील नागरिकांना मिळताच गावचे पर्यावरण रक्षक, MH29 हेल्पिंग हॅण्ड टीम घटनास्थळी पोहचून पाहिले असता अर्जुना बिट मधे भीषण आग लागल्याचे दिसून आले.

दोन फायर ब्लोवर मशीनच्या साह्यायाने जवळपास दोन तासाच्या अथक प्रयत्नांनी आगीवर नियत्रंण आनण्यास टीमला यश आले.यावेळी हेल्पिंग हॅण्ड टीमचे पर्यावरण प्रेमी जीवन तडसे, सूरज खडके, धीरज उम्रे, मुरली खडके, आणि गावचे गणेश मुरमुरे, दीपक कसदर यांनी आग विजवण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

जंगलास लागलेल्या आगीत अनेक प्रकारच्या वनौषधी, किटक, पक्षी त्यांची अंडी, तृणभक्षी प्राणी यांचा अधिवास नष्ट होतो. ग्रामस्थ जंगलात जातेवेळी बिडी, सिगारेट ओढून त्याचे थुटके जंगलात फेकतात. यामुळे जंगलास आग लागते. यावेळी सदस्यांनी जंगलास आग न लागण्यासाठी जंगलालगतच्या शेताचे धुरे, काडीकचरा खबरदारी घेऊन जाळावा. जंगलास आग लावणे हा दंडनीय अपराध असून, विविध कलमान्वये दोषी व्यक्तीवर कारवाई होते,

जंगलाला आग लागल्याचे दिसताच तत्काळ त्याची माहिती वणविभागाच्या हॅलो फॉरेस्ट 1926 किंवा संबंधित वनविभाग कार्यालय अथवाआमच्या MH29 हेल्पिंग हॅण्ड च्या हेल्पलाईन नंबर 9850577616 यावर माहिती देऊन आग विझविण्यासाठी वन विभागाला आवश्यक असे सहकार्य करावे, असे आवाहन संस्थापक व अध्यक्ष निलेशजी मेश्राम यांनी केले.