सह्याद्री चौफेर | योगेश मडावी
झरी जामणी : आदिवासी बहुत तालुका असून तालुक्यामध्ये गोंड, कोलाम, प्रधान, हे तीन समाज सर्वात जास्त प्रमाणात असून आज दिनांक २२ जानेवारी २०२३ रोजी गोंड समाज मांदी तालुकास्तरीय लावण्या आली.
गोंड समाजातील गाव पंच कमेटी घटया, महाजन, कारभारी देवारी, भूमक, यांना गांव बैठका घेऊन गोंड समाजातील पेन (देव) पूजा रीतीरिवाज येणाऱ्या समोरच्या पिढीकरिता कशा टिकवता येईल यासाठी गोंड समाज बांधव एकत्रीत करून तालुकास्तरीय सर्वांच्या मतांनी गोंड समाज मांदी लावण्याच्या पूर्वनियोजित गोणा बैठकीला उपस्थित सर्व गावातील गोंड पंच कमिटीच्या परवानगीने तालुका स्तरावर गोंड समाज कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
यामध्ये तालुका पंच कमिटीचे अध्यक्ष /महाजन म्हणून तिरू. चंद्रशेखर मेश्राम (सूर्ला), उपाधक्ष श्रीराम गोमाजी आत्राम (कोसारा), सचिव पदी तीरू. मारोती माधवराव कुसराम (पिम्प्रड), सहसचिव पदी - श्रावण मडावी (मांडवा), कोषाध्यक्ष - संजय मरसकोल्हे (माथार्जून), सहकोषाधक्ष - सतीश मडावी, (बैलंपुर) यांचा समावेश आहे.
सर्व निवड पदाधिकाऱ्यांचे कमिटी व उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.