टॉप बातम्या

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची नवी नियुक्ती : तालूका प्रमुख पदी विशाल किन्हेकार यांची निवड

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगावशिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या संघटन बळकटीसाठी आणि समाजकार्यासाठी नवी नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच मृद व जलसंधारण मंत्री महाराष्ट्र राज्य संजय राठोड यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

यात तालुका प्रमुखपदी विशाल मनोहर किन्हेकार, तालुका संघटकपदी प्रविण बल्की आणि तालुका समन्वयकपदी संजय आवारी यांची निवड झाली आहे. तसेच शहर स्तरावर शहर प्रमुखपदी विजय उंदरुजी मेश्राम शहर संघटकपदी सतीश खोके आणि शहर समन्वयकपदी लाभेश खाडे यांची नियुक्ती करण्यात आली.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या हिंदुत्ववादी विचारांसाठी आणि समाजहिताच्या कार्यांसाठी एकजूट आणि समर्पणाने काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.
Previous Post Next Post