टॉप बातम्या

श्रमदानाचा दुसरा दिवस : ग्राम संवाद ग्रुप चा स्तुत्य उपक्रम...

सह्याद्री चौफेर | लखन जाधव

घाटंजी : तालुक्यातील ग्राम संवाद ग्रुप तिवसाळा च्या वतीने चालू केलेल्या उपक्रमाचा आज श्रमदानाचा दुसरा. रविवार आजच्या उपक्रमामध्ये तिवसाळा ते कुराड रोड वरील खड्डे बुजवण्यात आले.
दरम्यान, रस्त्यावरील खड्डे बुजावण्यात येत असताना वामनराव राठोड (सरपंच किनी), बबलू भाऊ राठोड व विशाल भैया दुबे यांनी उपक्रमाला भेट दिली, यावेळी ग्रामसंवाद ग्रुप तर्फे चालू असलेल्या अनोख्या उपक्रमाबाबत मान्यवरांनी युवकांचे प्रांजळपणे मनोबल वाढविले. तसेच भविष्यात काही अडचण आल्यास आम्ही सदैव तुमच्या मदतीला राहू असे बोलून श्रमदान करणाऱ्या युवकांना प्रोसाहित केले.
यावेळी प्रेमभाऊ पवार, सरपंच (कामठवाडा), लखन जाधव, धनराज जाधव, योगेश राठोड, अमित जाधव, डॉ बिट्टू, सूरज टोंगे, साहील चव्हाण, पियूष चव्हाण, शुभम चव्हाण, राज भाई प्रथमेश अडकीने व प्रवीण राठोड आदीसह गावातील युवा उपस्थित होते.

Previous Post Next Post