Top News

पाटण पोलीसांची कोंबड्याच्या झुंजीवर धाड; १ लाख ३२ हजार ७४० रु.चा मुद्देमाल जप्त


सह्याद्री चौफेर | योगेश मडावी

झरी जामणी : पाटण पोलीस ठाण्याचे ठाणेदार संदीप पाटील यांना मिळालेलल्या गोपनीय माहीतीवरुन ग्राम कोडपाखिंडी जंगलामध्ये गेले असता काही इसम हे कोंबड्याला काती बांधुन त्याची झुंज लावुन त्यावर पैशाची बाजी लावुन हारजीतचा जुगार खेळ खेळवित असताना दिसुन आले. लपत छपत जावुन धाड टाकली असता पोलीसांना पाहुन काही ईसम पळुन गेले व काही ईसम हे मोक्यावर मिळुन आले व त्यांच्या जवळुन १ लाख ३२ हजार ७४० रु.चा मुद्देमाल जप्त करून पाच जुगार बहाद्दरवर जुगार ॲक्ट नुसार कारवाई करण्यात आली.

ठाणेदार यांना माहिती मिळाल्यानंतर तत्काळ एक चमू तयार करून ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली कोंबड्याच्या झुंज चालू असलेल्या ठिकाणी ठाणेदार संदीप पाटील, पोलीस अमलदार सुरेश राठोड, संदीप सोयाम, अमित पोयाम, प्रशांत तलांडे, रत्नाकर सलामे यांना पाठवण्यात आले. कोडपाखिंडी येथील जंगलात पोलीस कर्मचारी लपत छपत जाऊन त्या ठिकाणी कोंबड्याला काती बांधून हार जितचा खेळ सुरू असताना दिसून आले. पोलीसांना पाहताच काही इसम धावून पळून निघून गेले व काही इसमाला त्या ठिकाणी पोलीसांकडून पकडण्यात आले. त्यामध्ये अनिल तेजराव खडसे (३७) रा. कोडपाखिंडी, सचिन गोविंदराव बावणे (३७) रा. सुभाष नगर आदिलाबाद, गोपाळ वसंता आत्राम (२४) रा. कृष्णापुर तालुका केळापूर, जीवन किरणसिंग चंदेल वय (२४) रा. घोंसी तालुका केळापूर, शुभम किसन आत्राम (२८) रा. खडकडोह तालुका झरी जामणी यांचे कडून नगदी रक्कम १९७० रुपये, २ जिवंत कोंबडे किंमत ७५० रुपये व २ काती किंमत २० रुपये व २ मोटर सायकल किंमत १ लाख ३० हजार रुपये असा एकूण १ लाख ३२ हजार ७४० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व त्यांचे वर १२ ब अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.


Previous Post Next Post