Top News

ठाणेदारांनी केली वाळू तस्करावर कारवाई; ५ लाख १२ हजार रुपये चा मुददेमाल जप्त


सह्याद्री चौफेर | योगेश मडावी

झरी जामणी : पाटण पोलीस ठाण्याचे ठाणेदार संदीप पाटील यांना गोपनीय माहीती मिळाली की दुर्भा ते लिगंटी रोडवर एक इसम आपल्या स्वतःच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉली मध्ये अवैध रित्या वाळू भरुन नेत आहे. अशा माहीतीवरून पाटणचे ठाणेदारांनी ट्रॅक्टर लाल रंगाचा वाययुव्हीओ ५७५ थांबवुन ट्रॅक्टरच्या ट्रॉली मध्ये पाहणी केली असता ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये २ ब्रास रेती आढळून आली. वाळू भरून नेणाऱ्या गैर अर्जदारास रेती वाहतुकीचा परवाना संबंधीत कागदपत्रे बाबत विचारणा केली असता, ट्रॅक्टर चालकाजवळ व मालकाजवळ वाळू वाहतुक परवान्याचे कोणतीही कागदपत्रे नसल्याचे सांगितले. ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये २ ब्रास रेती किमंत १२ हजार रुपये व ट्रॅक्टर सह ट्रॉली किंमत ५ लाख रूपये असा एकूण ५ लाख १२ हजार रुपये चा मुददेमाल जप्त करुन ताब्यात घेतला दोघेही बिनापरवाना अवैधरित्या रेतीची चोरी करीत असतांना मिळुन आले. याप्रकरणी फिर्यादीच्या लेखी रिपोर्ट वरुन सुनील अशोक बाभुळकर रा. पाटण, नवन अशोक बदमवार रा. दुर्भा या दोघांवर गुन्हा नोंद करुन ठाणेदार संदीप पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पाटण पोलीस अधीक तपास करीत आहे.


Previous Post Next Post