Top News

घोंसा येथे तालुका स्तरीय खेळ व कला महोत्सव

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : खेळ व कला संवर्धन मंडळ पंचायत समिती, वणी चे विद्यमाने व समस्त ग्रामवासी घोन्सा यांचे सहकार्याने तालुका स्तरीय क्रीडा महोत्सव कार्यक्रम आज दि.३ जानेवारी २०२३ ते ६ जानेवारी २०२३ या कालावधीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घोन्सा येथे आयोजित केला आहे.

या चार दिवशीय होणाऱ्या मैदानी कला महोत्सवाला परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.
Previous Post Next Post