टॉप बातम्या

सावलीचे पोलिस स्टेशनचे ठाणेदार आशीषजी बोरकर यांची कार्यशाळा...

सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार 

सावली : स्थानिक विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथे पोलिस स्टेशनचे ठाणेदार माननीय आशीषजी बोरकर साहेब यांनी शिक्षक व विद्यार्थी यांना रहदारीच्या नियमांबाबत कार्यशाळेत मागदर्शन केले. रस्ते अपघातात जवळपास ८०% नागरिक मरण पावतात. रस्त्यावरून चालतांना, गाडी चालवताना ट्रॅफिकच्या नियमांचे पालन कसे करायला पाहिजे. १८ वर्षा आतील मुलांना वाहतुकीच्या नियमानुसार गाडी चालविता येत नाही. अशा वेळेस त्यांच्या पालकावर गुन्हा दाखल होवू शकतो. आपण वाहतुक नियम पाळले नाही तर दंड होईल या हेतूने वाहतुकीचे नियम पाळण्यापेक्षा आपल्या जिविताच्या रक्षणाकरिताच नियमांचे पालन करणे आवश्यक आहे हे लक्षात घेऊन रहदारीचे नियम पाळावे असे ते कार्यशाळेत बोलत होते.    
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक मुप्पावार सर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक राऊत सर, सुपले सर, प्यारमवार सर, स्वप्नील चव्हाण, पिदुरकर (पो.स्टे.सावली) उपस्थित होते.
Previous Post Next Post