सह्याद्री चौफेर | नितेश वनकर
गेल्या आठ ते दहा दिवसापासून सदर आत्महत्या करणारा इसम बेपत्ता होता. त्याने विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून वरोरा पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.
दिपक देवराव बोथले (33) रा. कानडा असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. गेल्या 10 दिवसापासून ते बेपत्ता होते,
आज दि 5 डिसेंबर सोमवारला चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील मार्डा गावाजवळील एका शेतात मृत अवस्थेत आढळून आले, जवळच त्याच्या विषारी (Poisson) ची बाटली पडून असल्याची अशी माहिती आहे.
अतिवृष्टीने शेतीचे आर्थिक नुकसानीचा फटका, कर्जबाजारी, सततची नापिकी यामुळे टोकाचे पाऊल उचलले असावं, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. तूर्तास नेमकं आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून त्याचे पाठीमागे आई-वडील, पत्नी, एक मुलगा, मुलगी असा बराच मोठा परिवार आहे.