सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : गेली पाच ते सहा वर्षांपासून वनोजा देवी परिसरात विद्युत सब स्टेशन व्हावे, अशी जुनी मागणी सामाजिक कार्यकर्ता प्रशांत भंडारी यांची होती. सतत च्या पाठपुरावा मुळे येथील विद्युत सब स्टेशनला आता हिरवी झेंडी मिळाली असल्याचे त्यांनी 'सह्याद्री चौफेर' ला बोलतांना सांगितले.
सन २०१७ ते २०१८ पासून सुरु असलेल्या सामाजिक कार्यकर्ता प्रशांत भंडारी यांच्या मागणीला शासनाकडून हिरवी झेंडी देण्यात आले. मार्डी सब स्टेशन वर होत असलेल्या ओव्हर लोड विद्युत प्रवाहाला कमी करण्यासाठी तत्कालीन वीज अभियंता साळुंखे यांनी वनोजा देवी परिसरात सब स्टेशन व्हावे
यासाठी त्यांनी प्रशांत भंडारी यांच्याशी एकदा आपले विचार मांडले, श्री भंडारी यांना ती गोष्ट पटली. त्यांनी हा प्रस्ताव आमसभेत ठोस पूर्ण मांडला. ग्रामपंचायतने ठराव पारित करून वीज सब स्टेशन मंजूर व्हावे यासाठी कागदपत्राची पूर्तता केली. तत्कालीन वीज अभियंता साळुंखे यांनी पाठपुरावा करून शासन दरबारी ठेवले.
सन २०१९ मध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याची टीम येवून जागेची शोधाशोध मध्येच हे मंजूर सबस्टेशन दुसरीकडे स्थलांतरीत झाले, पण प्रशांत भंडारी यांनी जनप्रतिनिधी यांचेशी सतत संपर्क करून त्यांना वनोजा देवी येथे विद्युत सब स्टेशन परत मंजूर करावे अशी आग्रही विनंती केली.
जनप्रतिनिधिंनी भंडारी व गावकरी यांच्या विनंतीला मान देत पाठपुरावा करून अखेर वनोजा देवी येथे विद्युत सब स्टेशन २०२२ मध्ये मंजूर झाले. वीज वितरण कंपनी या सब स्टेशनच्या कार्याला लवकरात लवकर सुरुवात करेल असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रशांत भंडारी यांना सांगितले.
यासाठी प्रशांत भंडारी यांना सहकार्य केले त्या सर्वांचे, अधिकाऱ्यांचे, जनप्रतिनिधी आमदार साहेब व गावाकऱ्यांचे तसेच तत्कालीन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे भंडारी यांनी मनःपूर्वक आभार मानले.
जाहिराती साठी संपर्क : 7218187198





