टॉप बातम्या

सामाजिक सभागृह हे विचार प्रबोधनाचे केंद्र व्हावे – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार 

चंद्रपूर : अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सर्व समाजाची प्रगती व उन्नतीच्या दिशेने योग्य प्रवास व्हावा, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या प्रयत्नात सर्वांनी सहभागी होण्यासाठी व गावाच्या प्रगतीचे चिंतन, मंथन करण्यासाठी सामाजिक सभागृहाचा उपयोग करावा. सामाजिक सभागृहे ही केवळ दगडमातीची इमारत न राहता विचार आणि प्रबोधनाची केंद्र व्हावीत, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले

पोंभुर्णा येथे महात्मा ज्योतीराव फुले, वीर बाबुराव शेडमाके व संताजी जगनाडे महाराज या तीन सामाजिक सभागृहाचे लोकार्पण करतांना ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, तहसीलदार शुभांगी कनवाडे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी आशिष घोडे, तसेच आशिष देवतळे, अलका आत्राम, अजित मंगळगिरीवार, शामसुंदर नैताम, अजित मंगळगिरीवार, विनोद देशमुख, गंगाधर मडावी, आशिष कावटवार, ऋषभ दारव्हेकर प्रामुख्याने उपस्थित होते.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();