सह्याद्री चौफेर | संतोष कुळमेथे
राजुरा : तालुक्यातील बामणवाडा येथे अवैद्य दारू सुरू असल्याने गुन्हेगारी वाढत आहे. यातूनच दिनांक 11 डिसेंबर 2022 ला शुल्लक कारणावरून खून करण्यात आला. यावेळी चंद्रपूर येथून पोलिसांचा मोठा ताफा गावात दाखल झाला होता.
दरम्यान,गावातील महिलांनी अप्पर पोलीस अधिक्षक जनबंधु मॅडम यांना ग्रामपंचायत च्या गाड्यात होत असलेली अवैद्य दारू बंद करण्याची मागणी केली. यावेळी जनबंधु मॅडम यांनी गट विकास अधिकारी (BDO) राजुरा यांना निवेदन देण्याचा सल्ला दिला, हा सल्ला घेऊन महिलांनी आज 12/12/2022 ला संवर्ग विकास अधिकारी राजुरा यांना निवेदन देऊन गाड्यात होत असलेली अवैद्य दारू बंद करण्याची मागणी केली. गटविकास अधिकारी (BDO) यांनी तत्काळ गाडा सील करून कारवाही करून गाडा खाली तत्काळ करण्याचे आदेश ग्राम सचिव तथा सरपंच बामनवाडा ह्यांना देण्यात आले.
यावेळी गावातील शेकडो महिला, तसेच आक्रोश जुलमे, संदीप कोडापे, शुभम नगराळे, राकेश कोडापे, सोबतच असंख्य गावातील नागरिक उपस्थित होते.