टॉप बातम्या

जैनम समूह द्वारा लोकांभिमुख उपक्रम

सह्याद्री चौफेर | कालू रामपुरे 

वरोरा : 'जे जे नव ते वरोराला हवं' या बेताने शहरात नव नवीन जैनम समूह तर्फे लोकांभिमुख उपक्रम असतात.

शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळेत 12 मुलं, 13 मुलींना शालेय गणवेश तसेच बिस्किट वितरित करण्यात आले.

जैनम ग्रुपच्या सदस्या शितल सुराणा, सुषमा चंगेडिया, मधु बोरा, रानी बोरा, खुशबु गांधी, स्मिता गांधी, साक्षी चंडालिया, प्रतिभा जैन, लीना नाहर, महिमा चोरडिया, निकिता संचेती, रिटा मोदी, दर्शना मोदी, रश्मी मोदी आदींची उपस्थिती होती.

यावेळी त्यांनी केलेल्या कार्याचे शाळा प्रशासन आणि माजी नगरसेविका प्रणालीताई मेश्राम यांनी अभिनंदन केले.
Previous Post Next Post