टॉप बातम्या

शेलोडी शाळेतील शिक्षकाची शाळेला दांडी


सह्याद्री चौफेर | चेतन पवार 
8806632763

दारव्हा : तालुक्यातील शेलोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक मुख्यालयी हजर न राहता नेहमीच शाळेत वेळेवर न येता मनमर्जिने उशिराने येतात.शाळेतील शिक्षक उशिराने येऊन,तासिकेच्या वेळेत कार्यालयात बसून राहतात.यासंदर्भात पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकाऱ्याकडे या आधी तक्रार करण्यात आल्यानंतरही शिक्षकांवर कुठल्याच प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही.याबाबत वारंवार तोंडी तक्रारी होत असल्याने दि २८ नोव्हेंबर रोजी काही पत्रकार व ग्रामस्थ शाळेत दाखल झाले असता,दुपारचे १२वाजता शाळेतील विद्यार्थी हे शाळेबाहेर फिरत असल्याचे आढळून आले.तसेच शाळेचा परिसर हा वाहतुकीचा परिसर असल्याने याठिकाणी अनुचित प्रकार घडल्यास याला जबाबदार कोण?या संदर्भात विचारणा करण्यासाठी कार्यालयात गेले असताना शाळेत कार्यरत वादग्रस्त शिक्षक अत्यंत उर्मट भाषेत उत्तर देत तुम्हाला शाळेत येण्याचा कुठलाही अधिकार नाही.तुम्ही आम्हाला विचारणारे कोण?तुम्ही आमचं काहीही करू शकत नाही. बातमी प्रसिद्ध केल्यास,पोलिस स्टेशन ला तक्रार करून अटक करायला लावू.या भाषेत धमकावत खोटे गुन्हे दाखल करण्याचा धमक्या दिल्याची तक्रार पत्रकार ईश्वर राठोड यांनी गटशिक्षण अधिकारी यांच्याकडे दाखल केली आहे.

शेलोडी येथील शाळेत नेहमीच असे प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे काही दिवसापूर्वीच शेलोडी शाळेतील विद्यार्थ्यांची पंचायत समितीच्या कार्यालयात शाळा भरविण्यात आली होती. वारंवार तक्रारी करुन व गटशिक्षण अधीकारी यांच्या कार्यालयात विद्यार्थांची शाळा भरविण्यात आल्या नंतर ही संबंधित शिक्षकावर कारवाई होत नसल्याने प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.गावातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रा.प. सदस्य,पत्रकारांन ना जर शाळेत न येण्याची तंबी शिक्षक देत असेल तर शिक्षकांच्या मनमानी कारभाराला आळा घालून कारवाई होणार का व नेहमीच वादग्रस्त असणार्‍या शिक्षकाची बदली करण्याची मागणी होत आहे न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा देण्यात आला आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();