सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
यवतमाळ : महात्मा जोतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मृती पर्व २०२२ यवतमाळ येथे सुरु आहे. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात अखिल भारतीय आदिवासी संवैधानिक हक्क परिषद द्वारा आदिवासीच्या राजकारणात इतर राजकीय पक्षाची भूमिका या विषयावर प्रसिद्ध आदिवासी साहित्यिक तथा विचारवंत गीत घोष यांनी अत्यंत परखड विचार मांडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेविका सुवर्णा वरखडे होत्या. याशिवाय विचारपिठावर राजाभाऊ चांदेकर, सुरेश कनाके, शैलेश गाडेकर, अशोक मसराम, चंद्रशेखर ठाकरे, सुनंदा मडावी, डॉ विनोद डवले, मा. विनायक कुमरे,मा. शालिनी पेटेकर,मा. रमेश मडावी आदी उपस्थित होते.
सत्ताधारी होण्यापेक्षा सत्तेत बसण्यासाठीच आजचे नेते हपापलेले आहेत. महापुरुषांनी सांगितलेला परिवर्तनवाद सोडून सुधारणावाद स्वीकारला आहे. त्यामुळे आमचा सगळ्या क्षेत्रात होत आहे, झाला आहे. सत्तेचे अस्तित्व आदिवासीच्या अस्तिवाबरोबरच आहे कारण आदिवासी या देशाचा मूलनिवासी आहे, विसरून चालणार नाही. एकेकाळी राज्यकर्ता असणारे आम्ही आमचे राज्य टिकवून शकलो नाही. आमचे राजे समजाभिमुख असले तरी मुत्सदी नव्हते. त्यामुळे त्यांना राजेपद गमावून मंडलिकत्व स्वीकारावे लागले. आजचा आमचा सुधारणावाद म्हणजे केवळ डागडुग्गी आहे. आमच्यामध्ये आत्मविश्वास जागृत करण्याचे कार्य फुले शाहू आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून १९५० सालीच केले.
१९५२ च्या सार्वत्रिक लोकसभेत आमच्या समाजाचे लोकप्रतिनिधी असूनही त्यांना समाजाच्या जाणीव नव्हती आणि आदिवासीच्या समस्या सोडवण्यात त्यांना अपयश आले आहे. त्यामुळे आजही आमच्या समस्या कायम आहेत, असे घोष यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनीषा तिरणकर यांनी केले संचालन आणि आभार प्रदर्शन एम के कोडापे यांनी केले. तर पाहुण्यांचा परिचय प्रल्हाद सिडाम यांनी करून दिला.