टॉप बातम्या

बोरी येथे जागतिक दिव्यांग दिनी शिवसेनेच्या वतीने चिमुकल्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

सह्याद्री चौफेर | चेतन पवार 

दारव्हा : तालुक्यातील बोरी अरब (चंद्रशेखर) येथे दिनांक 3/12/2022 रोज शनिवारला सकाळी 10.30 वाजता बोरी तील वार्ड क्रमांक एक मधील आठवडी बाजार येथील अंगणवाडी मध्ये चिमुकल्या बालकांना जागतिक दिव्यांग दिनानिमित्त विद्यार्थ्यांना बुक पेन्सिल चे वाटप करण्यात आले यावेळी बोरी चे माजी सरपंच ग्रामपंचायत अशोकराव ठाकरे, पी. एस. गिरी सर, गिरीजानंद कळंबे (युवासेना उपजिल्हाप्रमुख), आशिष सावंकार, पुंडलिक भुरे ( ठेकेदार) प्रा. मोनू सर, राजेश गुप्ता, राजेश गावंडे गुप्ता काका, सुमित हिवरकर, अविनाश क्षिरसागर, वैभव डाके, ऋषिकेश पावडे, तुषार शेंद्रे, सागर काकडे, सागर तांगडे, मंगेश नागपुरे, निलेश कराडे, प्रसाद बल्लाके, आदी शिवसेना-युवा सेना विद्यार्थी सेनेचे-पदाधिकारी उपस्थित होती. या कार्यक्रमाचे आयोजन बोरी शिवसेना युवा सेना विद्यार्थी सेना बोरी (चंद्रशेखर) यांनी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त केले.

यावेळी उपस्थित मान्यवर तथा ग्रामस्थ व अंगणवाडी शिक्षिका तथा सेविका.. उपस्थित होत्या. यावेळी कार्यक्रमाचे संचालन अंगणवाडी शिक्षिका निलिमा कदम यांनी केले तर,सौ. प्रीती निकोशे तथा सौ. कांचन हरिश्चंद्र शेंद्रे यांनी परिश्रम घेतले.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();