सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
9011152179
मिळालेल्या माहितीनुसार, मारेगाव तालुक्यातील अकरावीची १६ वर्षीय विद्यार्थीनी ही आपल्या कुटुंबियांसह राहतेय. येथे असतांना अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत राजकुमार रामभाऊ मेश्राम (२३) रा. श्रीरामपुर, याने तिच्यावर अधून मधून अत्याचार केला. या अत्याचारातून पीडित मुलगी ४ महिन्याची गर्भवती राहिल्याचा धक्कादायक! प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात कलम 376,376 (1) (A), 376 (2) (J,N) 4,6 बाललैंगिक अत्याचार (पोक्सो) सह विविध कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात मारेगाव पोलीस करित आहे.