टॉप बातम्या

रोजगार मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

सह्याद्री चौफेर | योगेश मडावी 

झरी : आज दिनांक 24/11/22 रोजी नवी उमेद संस्था, पांढरकवडा व कोरो इंडिया, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाश्वत उपजिविका करिता रोजगार मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

 या कार्यक्रमाचे संचालन फेलो संगिता मडावी यांनी केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. अमित कुळकर्णी यांनी केले. यावेळी त्यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्याचा उद्देश समजावून सांगितला.कोरोच्या राणी येडसीकर यांनी कोरोच्या कामाची मांडणी केली.यावेळी पांढरकवडा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने साह्ययक प्रकल्प अधिकारी श्री. सोनार साहेब, साह्ययक प्रकल्प अधिकारी श्री. रामटेके साहेब व साहायक प्रकल्प अधिकारी श्री. उके साहेब यांनी आदिवासी विभागातील विविध योजनांची माहिती दिली. तसेच पांढरकवडा येथील पेसा समन्वयक श्री. विनकरे सर यांनी पेसा कायद्याचे आदिवासी समाजातील लोकांना असणारे अधिकार व पेसाचा संबंध निधी याविषयी मार्गदर्शन केले.

प्रतिभा ताई दुर्गे व रामटेके मॅडम यांनी महिलांसाठी असणाऱ्या कायद्याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कविता जुमनाके यांनी केले.
Previous Post Next Post