टॉप बातम्या

जैनुद्दीन जव्हेरी यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित मोहदा येथे निराधार व दिव्यांगाना ब्लॅंकेट वाटप!


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 
7218187198

वणी : मा. जैनुद्दीन जव्हेरी यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित लाभार्थ्यांना ८० ब्लॅंकेट्स पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या मोहदा येथील ८० निराधार व दिव्यांग लाभार्थ्यांना आज दिनांक ८/११/२०२२ रोजी ग्रामपंचायत च्या खुल्या पारांगणात जैनुद्दीन जव्हेरी यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त ब्लॅंकेट वाटप कार्यक्रम संपन्न करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ वर्षा रवींद्र राजूरकर सरपंचा यांची उपस्थिती होती.
यावेळी विचार मंचावर शिरपूर ठाणेदार, उपसरपंच सचिन रासेकर, इस्माईल जव्हेरी, ग्राम विस्तार अधिकारी मनोज उरकुडे, गणेश बोंडे, गजानन शेलवडे, सौ अर्चना गेडाम, सौ सीमा ढुमणे, सौ शोभा टेकाम, सौ बेबी उईके, सौ सुवर्णा बोंडे व मोहदा गावातील नागरिक यांची यावेळी उपस्थिती होती. यावेळी मा.इस्माईल जव्हेरी यांनी या कर्मभूमीत विदर्भ प्रो.प्रा लिमिटेड मोहदा नावे माझे युनिट असून गावाच्या गरजेचे दायित्व पूर्ण करणे त्यासाठी खारीचा वाटा होऊन सहकाऱ्य पूर्ण करणे हे माझे आद्य दायित्व असून, ग्रामपंचायतीच्या जागृतीने हे काम सत्कर्मी लागले असून ते पूर्ण करण्याची संधी हे माझे भाग्य असल्याचे या कार्यक्रम प्रसंगी सुतोवाचन केले.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित मान्यवराचे स्वागत करून इस्माईल जव्हेरी यां च्या हस्ते निराधार दिव्यांग लोकांना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित विचार मंचावरील प्रमुख पाहुण्यांनी जनतेची गरज लक्षात घेऊन मदत केली तर ती मदत देवदानापेक्षा मानवतेसाठी फार महत्वाची असते, हे हेरून सर्व क्रेशर धारकांनी आपले वाढदिवस साजरी करताना गरजवंतांना मदतीचा हात पुढे केला तर जीवनातील गरज पूर्ण होऊ शकते, ते काम पूर्ण करण्यासाठी मनाची इच्छा पूर्ण करून पैशाचा सदुउपयोग योग्य पद्धतीने झाला तर गोर गरीबाच्या मदतीचा हात ठरतील असे सुतोवाचंन केले. या वेळी 80लाभार्थी यांना ब्लॅंकेटचे वाटप करून हिवाळ्याची ऊब निर्माण करून दिली. ब्लॅंकेट वाटपाचा कार्यक्रमामुळे लाभार्थ्यांनी जव्हेरी यांचे आभार मानले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकुमार वडस्कर यांनी केले,तर आभार प्रदर्शन गणेश बोन्डे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता ग्रामपंचायत कर्मचारी व ग्राम वासीयाने अथक परिश्रम घेतले. ब्लॅक वाटप कार्यक्रमातून कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली.
Previous Post Next Post