सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार
9623494935
सावली : रात्रौ आठ वाजताच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 930 वर मोखाळा पेट्रोल पंपा समोर नवभारत विद्यालय व्याहाड बूज चे शिक्षक किशोर महादेव झोडे हे फिरायला गेले असता त्यांना अज्ञात चारचाकी वाहनाने जोराची धडक दिली त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. उत्तरीय तपासणीसाठी सावली ग्रामीण रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले आहे. सावली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक आशिष बोरकर यांच्या नेतृत्वात पुढील तपास चालू आहे.