सह्याद्री चौफेर | राहुल रामटेके
7066027404
नागभिड : नागभिड तालुक्यातील जनकापूर येथे श्री गुरूनानक जयंती निमित्त "५५३ आगमन गुरुपुरब उत्साह" श्रद्धापुर्वक थाटामाटात साजरा करण्यात आला. श्री गुरूव्दारा प्रबंधक कमेंटी जनकापूर व्दारा दि.६ ते ८ पर्यंत गुरूपुरुब कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यात अखंड पाठा ची सुरुवात, अखंड पाठा ची समाप्ती, निशान साहिब का पवित्र चोला चढाने का कार्यक्रम, शब्द किर्तन, पवित्र अरदास, गुरुमत समागम, तथा लगंर, आदी गुरुपुरुब कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रम गुरुद्वारा प्रबंधक कमेंटी चे प्रधान भगतसिंघ जुनी, मितप्रधान दयालसिंघ जुनी, सेकेटरी आझादसिंघ जुनी, मितसेकेॗटरी॓ अमरसिंग टाक, खजांजी आवतारसिंघ जुनी, सदस्य धरमसिंघ जुनी, गुरुदेवसिंघ जुनी, यांनी या कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य केले.तसेच माजी सदस्य जंगुसिंघ जुनी, हिरदेसिंघ जुनी, असासिंंघ जुनी, व जनकापुर आणि बोंड या गावातील,समुह शिख बांधवांच्या सहकार्याने हा कार्यक्रम श्रद्धा पुर्वक साजरा करण्यात आला. सरदार समशेरसिंघ जुनी यांचे वतिने यावेळी नागरिकांसाठी अल्पोहार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला परिसरातील शिखंबाधंव उपस्थित होते.