सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
7218187198
मारेगाव : पदवीधरांच्या अनेक समस्या असल्या तरी त्या सोडवण्यासाठी सर्व घटक सहभागी होतात. त्यामुळे लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी पदवीधर युवकांनी पुढे यावे, असे आवाहन तालुका अध्यक्ष मारोती गौरकार (काँग्रेस कमिटी मारेगाव) यांनी केले.
23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर पर्यंत पदवीधर मतदार संघाची नोंदणी आता पदवीधरांना करता येणार आहे. त्यामुळे अमरावती विभागातील पदवीधरांनी न चुकता मतदार संघात आपलं नाव नोंदणी करावे.
पदवीधरांना नोंदणीसाठी शेवटची संधी असून त्यासाठी नोंदणी कार्यक्रम राबविण्यात आला आहे. जिल्ह्यातील एकूण पदवीधरांच्या तुलनेत अतिशय कमी नोंदणी झाली आहे. निवडणूक विभागाने वारंवार जनजागृती करूनही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याने निवडणूक आयोगाने नोंदणी साठी आता ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या प्रक्रियेचा वापर करून अधिकाधिक पदवीधरांनी आपले मतदार म्हणून नोंदणी करावी. 23 ते 9 डिसेंबर ही शेवटची संधी आहे. त्यामुळे मारेगाव तालुक्यातील सर्व पदवीधरांनी आपले पदवीधर मतदार संघात नाव नोंदणी करावे असे, आवाहन ता. अध्यक्ष मारोती गौरकार यांनी प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.
"आता मोबाईलवरुनही घरबसल्या मतदार नोंदणी करता येईल, सीईओ इलेक्शन डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर जावून अर्ज करता येतो."