सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : ज्या मार्गाने जड वाहतूक जायला पाहिजेत किंबहुना वाहतुकीची परवानगी आहे त्या मार्गाने न जाता डिझेल, टोल वाचवण्याच्या नादात अवैध जड वाहतूक चालक क्षमता नसलेल्या रस्त्याने आपली जड वाहतूक करित असल्याने करणवाडी ते खैरी रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहेत. त्यामुळे या मार्गाने परिसरातील वाहतूक करणाऱ्या प्रवाशीयांना प्रवास करतांना तारेवरची कसरत करावी लागत असून नागरिक,विद्यार्थी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी सदर मार्गांवरील जड वाहतूक बंदच करा अशी प्रमुख मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली होती. याबाबत निवेदनही देण्यात आले होते, परंतु संबंधित विभागाने तिळमात्र दखल घेतली नसल्याने काल मध्यरात्री पासून च महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक होऊन आंदोलनाला सुरुवात केली. या दरम्यान,काही वाहन रोखण्यातही आली असून तर काहींना आंदोलनाचा अंदाज येताच व मनसेच्या धसक्याने आपली वाहने अन्य मार्गाने पळवली होती. काल आणि आज मनसेचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट व सहकारी आंदोलनाच्या पवित्र्यावर ठाम होते. या रस्त्यावर जड वाहतूक पुन्हा दिसून आल्यास त्यांना मनसे स्टाईल दाखवली जाईल असा दम ही दिला. मात्र काही मुजोर वाहनधारक वाहतूक करित होती,त्यामुळे आज परत सकाळपासून आंदोलनाला सुरुवात झाल्याने आंदोलन आक्रमक झाल्याचे चित्र लक्षात घेता ठाणेदार पुरी हे आंदोलनस्थळी येवून आंदोलन कर्त्यांशी चर्चा करून परत सदर मार्गाने जड वाहतूक होणार नाही असा शब्द महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना दिला.
तूर्तास करणवाडी ते खैरी मार्गावरील जड वाहतूक बंद करण्यात आली. या यावेळी आंदोलनात जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, तालुका अध्यक्ष अविनाश लांबट, सरपंच सुरेश लांडे, प्रशांत चौधरी, वसंता घोटेकर, गणेश खुसपुरे, अनिल पारखी, अंकुश वैद्य, आशिष खंडाळकर, नगरसेवक अनिल गेडाम, सरपंच प्रवीण नान्हे, शहर अध्यक्ष नबी शेख, मनविसे लाभेश खाडे, सरपंच राहुल आत्राम, सुमित जुनघरी, विजू दानखेडे, चांद बहादे, संतोष राठोड, आकाश खामणकर यासह असंख्य मनसैनिक व परिसरातील जनता सहभागी झाले होते.