Top News

जगदंबा उर्फ लखमाई मातेच्या मंदिरात गर्दी नियंत्रणासाठी स्काँऊट गाईड


चेतन पवार | सह्याद्री चौफेर 

दारव्हा : तालुक्यातील पाथ्रड देवी येथे नवरात्रात जगदंबा उर्फ लखमाई मातेच्या दर्शनासाठी जिल्ह्यातील भाविकांची मोठी गर्दी असते. ही गर्दी शिस्तबद्ध पद्धतीने नियंत्रणात आणण्यासाठी,भाविकांना सहकार्य करण्यासाठी आज शेवटच्या दिवशी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेने स्काँऊट व गाईडचे पथक तैनात केले.

भाविकांना शांततेने लखमाई मातेचे दर्शन घेता यावे यासाठी महीलांची व पुरुषांची वेगवेगळी शिस्तबद्ध रांग,भाविकांना मंदिरात क्रमाक्रमाने सोडणे.अशा पद्धतीने गर्दी होणार होणार याची काळजी घेत भारत स्काँऊट व गाईड पथकाने एकदिवसीय चांगला उपक्रम राबविला.

उच्च श्रेणी मुख्याध्यापिका श्रीमती सुनिता रोहणकर यांचे मार्गदर्शनात स्काँऊट मास्टर संदीप खांदवे,स्काँऊट पथकात सक्षम भगत,अग्नी राठोड,महेश पवार,गुरुदेव राठोड,कुंदन पारिसे ,गाईड पथकात सोनाली आमझरे,भावना आमझरे, कल्याणी जांभोरे,पुजा जांभोरे,हसरी पचारे,जान्हवी गायकवाड यांनी सहभाग नोंदविला.

यावेळी ईश्वरदास पारवेकर, गुरुदेव घोगले,अंबादास आरु,प्रमोद घोडाम शैलेश चौकडे ,निलिमा गुल्हाने,उमेश पवार,आकाश राठोड,चेतन पवार वार्ताहर यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.
Previous Post Next Post