चंदू राऊत |सह्याद्री चौफेर
वणी : एस. पी. एम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आज दि 4 ऑक्टोबर रोजी मिशन स्वच्छ भारत या योजनेअंतर्गत महात्मा गांधी च्या जयंती निमित्याने जिल्यातील सर्व शाळांमध्ये project Lets change अंतर्गत स्वच्छता मॉनिटर अशी जबाबदारी स्वीकारून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे असा उपक्रम आज विद्यालयात राबवण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी वर्ग तसेच शाळेचा सर्व परिसर स्वच्छ केला यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री क्षीरसागर सर व उपमुख्याध्यापक श्री तामगाडगे सर हजर होते तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी हजर होते सर्व विद्यार्थ्यांनी या अभियानात उत्स्फूर्त भाग घेतला.