Top News

येत्या १० दिवसात शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या - अन्यथा... राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा ईशारा

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : येत्या 10 दिवसाच्या अतिवृष्टी चा लाभ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नाही. तर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना घेवून मारेगाव शहराच्या हद्दीत रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा सज्जड दम राष्ट्रवादी युवक काँग्रेस, मारेगाव च्या वतीने देण्यात आला. आंदोलनामुळे होणाऱ्या नुकसानीला शासन स्वतः जबाबदार राहील असे ईशारा दिला आहे.

मारेगाव झरी वणी या तालुक्यात जुलै ऑगस्ट मध्ये महापूर व अतिवृष्टी ची आर्थिक मदत अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत असून येणाऱ्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे हवालदिल झालेल्या जगाच्या पोशिंद्यानी आत्महत्या सारखा मार्ग मोठ्या प्रमाणात उराशी अवलंबीला आहे. हे काही दिवसापासून दिसून आले आहे. परिणामी शासनाने कुठलीही उपाय योजना केलेली नाही, व महापूर, अतिवृष्टीची नुकसानीची आर्थिक मदत कुठल्याही शेतकऱ्यांना मिळाली नाही. नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकरी शासनाच्या मदतीकडे डोळे लावून बसले आहेत. (मारेगाव पोलीस स्टेशन निवेदन देताना राष्ट्रवादी चे पदाधिकारी )

मात्र असे दिसून येतेय की, शासन प्रशासन निद्रावस्थेत आहे. यामुळे शेतकऱ्यांवर कुठलीही अडचण यावी नाही, यासाठी शासनस्तरावर तात्काळ निर्णय घेवून अतिवृष्टी व महापूर नुकसानीची आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. अन्यथा तालुक्यातील शेतकऱ्यांना घेवून मोठ्या प्रमाणात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा ईशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष सचिन पचारे व तालुका अध्यक्ष भारत मत्ते यांच्या नेतृत्वात तहसीलदार पुंडे यांना  निवेदनातून देण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान होणाऱ्या नुकसानी ची जबाबदारी शासनाची असेल असे मारेगाव पोलीस स्टेशन ला निवेदनातून कळविण्यात आले.


या झोपलेल्या शासनाला जागे करण्यासाठी तालुक्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन पचारे, रा कॉ. तालुका प्रमुख भारत मत्ते, दयाल रोगे (उप तालुका प्रमुख), नितीन गोडे (तालुका प्रमुख रा यु कॉ), रा कॉ शहर प्रमुख मुन्ना भाई शेख, हेमंत नरांजे (नगरसेवक नप, मारेगाव ), अतुल पचारे यांच्या सह मारेगाव तालुक्यातील शेतकरी बांधव उपस्थित होते.
Previous Post Next Post