विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर
मारेगाव : मारेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या दोन वेगवेगळ्या घटनेत दोन तरुणाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आल्याचे वृत्त आहे. या प्रकरणी ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तालुक्यातील नरसाळा परिसरातील एका मुरूमाच्या खदानीच्या खड्डयात उडी घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना गुरुवार दि. 6 ऑक्टोंबर रोजी सकाळी 8. वाजताचे सुमारास उघडकीस आली असून, मृतक दीपक देवीदास रामपुरे (२२) रा. गोंडबुरांडा असे युवकाचे नाव आहे. दीपक हा दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती सुत्रांकडून सांगण्यात येतय.
तर, दुसऱ्या घटनेतील स्वप्निल राजू पाचभाई रा.केगाव याने शेतामध्ये कीटकनाशक औषध प्राशन सकाळी 8 वाजताचे सुमारास घेतले, अशातच वडील शेतात गेले असता हा प्रकार दिसून आला. मात्र, या दोन विविध घटनेचे नेमकं कारण कळू शकले नाही. दोन्हीही घटना एकाच दिवशी घडल्याने तालुका हादरून सोडला.
या प्रकरणी पोलिस अधिक तपास करित आहेत.