Top News

मारेगाव येथे एक दिवसीय धरणे आंदोलन...

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : आज दिनांक 4/10/2022 रोजी मंगळवार ला बेंबळा कालवा, उप कालवा फुटून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्या नुकसानीचा तत्काळ मोबदला देण्यात यावा तसेच अती वृष्टी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येत्या चार दिवसात जमा करावे व पूर बुळी चा वेगळा मोबदला द्यावा व इतर शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्या या मागण्या साठी तहसील कार्यालय मारेगाव येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी सरपंच संघटना बेंबळा संगर्ष समिती पत्रकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आंदोलन पार पडले. या आंदोलनाला मनसे,राष्ट्रवादी अखिल भारतीय आदिवासी संघटना, संभाजी ब्रिगेड, या पक्ष व संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला.

या आंदोलनाला प्रमुख नेतृत्व अखिल भारतीय सरपंच संघटना चे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट, सचिव सुरेश लांडे, बेंबाळा संघरश समिती चे आधक्ष सुमित जूनगरी, सचिव सुधाकर इंगोले, माणिक कांबळे, राऊत सर, धनफुले सर, सतीश ताजने, सरपंच प्रवीण नाणे, पांडुरंग ननावरे, अभिजित मांदेकर, संजय गोहोकर, गजू आदेवार, जगदीश ठेंगणे, चांदुजी जवादे, शेतकरी निरंजन येसेकर, अंकुश वैद्य, आशिष खंदळकर, वसंता घोटेकर, लंसावळे महाराज व इतर कुंभा मार्डी परिसरातील असंख्य शेतकरी उपस्थित होते.
Previous Post Next Post