सह्याद्री चौफेर | न्यूज
वणी : तालुक्यातील मुर्धोनी येथील रहिवासी व सध्या आर्मीत लेफ्टनंट कर्नल वासुदेव दामोधर आवारी(३५) यांचे हिमाचल प्रदेशात ड्युटीवर तैनात असताना हृदयविकाराने निधन झाले. ते चीनच्या सीमेवर ड्युटी बजावत असताना त्यांना अचानक श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यांना लगेच मिल्ट्रीच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
त्यांच्या मागे आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगा व बराच मोठा आप्तपरिवार आहे. आज बुधवारी सायंकाळी त्यांचे पार्थिव वणी येथे आणण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांतर्फे देण्यात आली.