Page

वणीचे सुपुत्र लेफ्टनंट कर्नल वासुदेव दामोदर आवारी "अमर रहे"च्या गजरात अनंतात विलीन

रवी घुमे | सह्याद्री चौफेर 

वणी : मंगळवार दिनांक 4 ऑक्टोबर ला अरुणाचल प्रदशातील चीन च्या सीमेवर हृदय विकाराच्या झटक्याने वणीच्या सुपुत्राला वीरगती प्राप्त झालेल्या लेफ्टनंट कर्नल वासुदेव दामोदर आवारी यांचे पार्थिव गुवाहाटी वरून गुरुवार दिनांक 6 ऑक्टोबर ला दुपारी नागपूर येथे आणण्यात आले.कामठी बेस तर्फे मानवंदना व सलामी विमानतळावरच देऊन लष्करी वाहनाने त्यांचे पार्थिव टागोर चौक वणी येथे रात्रौ 9 पर्यंत पोहोचले,अंतिम दर्शनासाठी "भारत माता की जय, आवारी सहाब अमर रहे" च्या घोषणात जनसागर लोटला.
         
या वेळी स्थानिक पोलीस प्रशासन व गृहरक्षक दलाने चोख बंदोबस्त ठेवला. काल शुक्रवारी दिनांक 7 ऑक्टोबर त्यांचे मुळगाव मुर्धोनी ता.वणी.जि.यवतमाळ येथ 11.00 वा. सरकारी इतमामात त्यांना सैन्य दलाच्या जवानांनी अखेरची सलामी व मानवंदना दिली व स्थानिक पोलीसांच्या पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली.चार वर्षांचा मुलगा अव्यान याने पार्थिवाला मुखाग्नी दिला.हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले.

  ले.कर्नल वासुदेव आवारींचा संक्षिप्त जीवनपट

18/08/1987 ते 4/10/2022
वणीच्या शीरेपेचात मानाचा तुरा रोवणारे ले.क.वासुदेव यांचा जण्मं 18/08/1987 ला मुर्धोनी येथील एका सुसंस्कृत शेतकरी कुटुंबात झाला. वडील ह.भ.प. डॉ. दमोदरराव हे कीर्तनकार,संगीताचे ज्ञानी व वारकरी संप्रदायाचे गाढे अभ्यासक असल्यामुळे 5 वी पर्यंत शिक्षण घेत असतानाच कर्नल वासुदेव यांनी वणीचे कै.गजेंद्र बापू पवार गुरुजींकडे शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले व ही कला लष्करी शिक्षण घेत असतांनाही जोपासली.पुजापाठ करणे हे त्यांचे नित्याचेच संस्कार.
        
त्यांचे शिक्षण बालवीद्या मंदिर वणी येथून सूरु झाले.पुढे 5 वीत विवेकानंद विद्यालय वणी, नंतर 6 विच्या प्रवेशाकरीता भारतात अग्रगण्य असलेली सातारा येथील सैनिकी शाळेत पात्रता परीक्षा व वैद्यकीय चाचणीत अव्वल येऊन सैनिकी शाळा सातारा येथे 12 वी पर्यंत शिक्षण पूर्ण केले.पुढे खडकवासला पुणे येथील N.D.A.(National Defence Acadamy) मध्ये निवड होऊन 4 वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण करून 2010 मध्ये भारतीय सैन्य दलात त्यांची लेफ्टनंट पदी निवड झाली. तिथून गुजरात येथील धांगधरा येथे प्रथम नियुक्ती मिळाली. त्यानंतर पठाणकोट, लडाख, जम्मू काश्मीर,वेलिंग्टन,नाशिक, डेहराडून ई.ठिकाणी देशसेवा दिली.

वयाच्या 60 वर्षांपर्यंत लष्करात राहून देशसेवा करण्याची इच्छा मात्र अपूर्ण राहिली.

वडील दामोदरपंताच्या शोकसंवेदना.

माझ्या मुलाला मात्रूभूमीचे रक्षण करतांना मरण आले.याचा मला अभिमान आहे.
सैन्यदलात मुलाला पाठविल्यास तो मरतोच असे नाही.
सोबतच सैन्यात गेलेल्यांना मद्यपान व मौंस खावेच लागते असा आग्रह नसतो. युवा पिढीने सैन्यात जाऊन देशसेवा करावी. असे डॉ.दामोदर आवारी शोकसंवेदनेत आमच्या प्रतिनिधीला बोलले. दिवंगत वासुदेव यांच्या मागे आई, वडील,थोरले भाऊ श्रीकांत, पत्नी निकीता व चार वर्षांचा मुलगा अव्यान आहे.