Page

8 ऑक्टोबर जागतिक रक्तदान दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, गुजरात या राज्यात नावरूपात आलेल्या गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को. ऑपरेटीव्ह सोसायटी लि.नांदेड, शाखा वणी तर्फे दिनांक 8 ऑक्टोबर ला जागतिक रक्तदान दिनानिमित्त, रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान नागपूर येथील तसेच एक युनिट वणीतील सुगम हॉस्पिटल येथे असलेली लाईफ लाईन रक्तपेढी होती. रक्तदात्यांचा उत्कृष्ठ सहभाग यावेळी दिसुन आला त्यातच जिकडे तिकडे रक्तदान असुन सुद्धा रक्तदात्यांनी रक्तदानाचे महत्व समजून 21 रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले.
   
गोदावरी अर्बन कडून नेहमीच नित्य नियमाचे समाजपयोगी उपक्रम सुरू असते. रक्ताची गरज लक्षात घेता दिनांक 8 ऑक्टोबर ला रक्तदान शिबिराचे आयोजन वणी येथील श्री संत गाडगे बाबा चौक, गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को. ऑप सोसायटी लि. नांदेड, शाखा वणी येथे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाचे अध्यक्ष पुसद अर्बन बँकेचे उपाध्यक्ष, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष तथा क्रांती युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राकेशभाऊ खुराणा होते तर प्रमुख अतिथी म्हणून शहरातील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ सुनीलकुमार जुमनाके उपस्थित होते.

या प्रसंगी, अध्यक्षीय भाषणात राकेशभाऊ खुराणा यांनी सांगितले की, गोदावरी अर्बन ही बँकिंग सोबतच सामाजिक बांधिलकी जपणारी बँक असुन नेहमी नवनवीन उपक्रम राबवित, समाजात एक वेगळा ठसा उमठवीत आहे, तसेच डॉ. सुनील जुमनाके सर यांनी देखील गोदावरीच्या या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
      
लाईफ लाईन नागपूर येथील रक्तपेढी ज्यांचे एक युनिट सुगम हॉस्पिटल येथे असुन,लाईफ लाईन रक्तपेढीतील मधील रवी गजभिये सर व चमू यांनी रक्तदानात शिबिरात महत्वाची भूमिका बजावली असून या शिबिरात 21 रक्तदात्यांनी आपले योगदान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते राजुभाऊ गव्हाणे यांनी तर,आभार सुरज चाटे यांनी मानले.

या कार्यक्रमासाठी वणी शाखेतील शाखा व्यवस्थापक विजय मोडक, भद्रावती शाखेचे शाखा अधिकारी अनिरुद्ध पाथ्रडकर, सहायक शाखा व्यवस्थापक सुनील चिंचोळकर, कनिष्ठ अधिकारी सौ प्रांजली ठाकरे, सुरज चाटे, तुषार ठाकरे, मंगेश करंडे, शुभम पिंपळकर, सब स्टाफ आतिष बुरेवार, जयवंत ओचावार तथा समस्त दैनिक, आवर्त ठेव अभिकर्ता उपस्थित होते व त्यांचे मौलिक सहकार्य लाभले.