चंदू राऊत | सह्याद्री चौफेर
मागील पंधरा दिवसापासून वणी उपविभागात संततधार पाऊस अधून मधून कोसळत आहे. अशातच धरणाचे पाणी वर्धा नदीत समोरच्या दृष्टीने सोडण्यात आल्यानंतर नदी काठावरील वसलेले गाव पुराच्या पाण्याने प्रभावित झाली, असंख्य घरात पाणी शिरले, शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले, मुक्या जनावरांना मुकावं लागलं. अशा कठीण परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर पीडितांच्या मदतीला सरसावली आहे.
एकंदरीत सगळीकडे हाहाकार असतांना वनोजा देवी येथील पूर पिडितांना मा.श्री राजाभाऊ उंबरकर यांनी साधारणतः 15 दिवस पुरेल एवढे अन्न धान्य व किराणा किट ची तात्पुरती मदत म्हणून वाटप करण्यात आले. दरम्यान, राजूभाऊ कार्यकर्त्यांना सोबत घेवून पूर पीडित कुटुंबियांना भेट घेवून त्यांची विचारपूस व त्यांच्या सध्याची सोय म्हणून नुकसान ग्रस्ताना मदत दिल्या जात आहे.
या उल्लेखनीय कार्याबद्दल वनोजा येथील उपसरपंच जनार्दन गाडगे यांनी व ग्रामस्थांनी राजाभाऊंचे व त्यांच्या कार्यकर्त्यांचे आभार मानून धन्यवाद देण्यात आले.
"आज पुरामध्ये इतके नुकसान झाले की, ते शब्दात सांगू शकत नाही. अशा वेळी प्रशासनाने तात्काळ लोकांना मदत करायला पाहिजेत मात्र, प्रशासन शासनाची मदत कुठेही मिळताना दिसत ही शोकांतिका आहे." - नागरिक