![]() |
कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
मारेगाव : संपूर्ण मारेगाव तालुक्यात अतिवृष्टीने प्रभावित झाल्याने जन जीवन विस्कळीत झाले, संपूर्ण पिके पाण्याखाली आल्यामुळे शेतीची नासाडी झाली आहे. कित्येक गावांचा संपर्क तुटला, तर घरांची परझड झाली, परिणामी शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 25 हजार रुपये मदत देण्यात यावी व संपूर्ण मारेगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा याकरिता तहदिलदारामार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
मागील विस दिवसापासून सतत संततधार तालुक्यात सुरु आहे. अशातच बेंबळा, अप्पर वर्धा धरणाचे दरवाजे उघडल्याने मोठ्या प्रमाणात विसर्ग होऊन पूर परिस्थिती निर्माण झाल्याने नदी काठावरील शिवणी, आपटी, गोरज, दांडगाव, वनोजा, मुकटा, सोईट कोसारा, चिंचमंडळ, गाडेगाव, केगांव, दापोरा, बोरी (ग), चनोडा गावांना व अन्य या महापुराचा जोरदार फटका बसला. अनेकांना आपलं घर सोडावं लागलं, या पुरामध्ये शेतीची सर्वात मोठी हानी झाले आहे. त्यामुळे शासनाने सरसकट शेतकऱ्यांना मदत देणे गरजेचे आहे. तसेच नदी काठावरील वसलेल्या गावांना पुरा मध्ये जी यातना सोसावी लागली त्या नुकसान ग्रस्त पीडितांना वेगळं पॅकेज जाहीर करण्यात यावे अशीही मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदन देते वेळी चिकटे साहेब तालुका अध्यक्ष भाजपा, प्रशांत नांदे तालुका सरचिटणीस भाजपा,अनुप महाकुलकर युवा मोर्चा शहर अध्यक्ष, विश्वजित गारघाटे तालुका उपाध्यक्ष, नवसू सुडीत तालुका उपाध्यक्ष,विठ्ठल दानव, शशिकांत आंबटकर, दत्तू लाडसे, राहुल राठोड बांधकाम सभापती न.प., मारोती राजूरकर नंदू खापणे, प्रतीक धानकी, शैलेश ठक व इतर पदाधिकारी उपस्थित होते.