टॉप बातम्या

उदगीर: शंभर फुटाच्या रस्त्यासाठी पत्रकारांचे तीव्र आंदोलन

बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर 

उदगीर : उदगीर शहर हे तीन राज्याच्या सीमेवरती असलेले असून उदगीर हे उपजिल्हाचे ठिकाण असून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महाराष्ट्रातील नामांकित असलेल्या महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयापर्यंत पक्के सिमेंट रोड च्या रस्त्याचे काम सध्या सुरू असून शंभर फूट रस्त्याचे काम असताना व रोडच्या दोन्ही बाजूने पक्के बांधकाम असलेले हॉटेल दुकाने असून सध्या 80 फुटाचा रस्त्याचे काम सुरू आहे.

 शासनाकडे याचे लक्ष वेधण्यासाठी पत्रकारांच्या वतीने गेल्या बारा दिवसापासून तीव्र आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सुरू असून आत्तापर्यंत हलकी आंदोलन तिरडी आंदोलन शासनाच्या विरोधात सुरू असून अद्याप या आंदोलनाकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे.
आजच्या या आंदोलनाच्या बारावी दिवशी महाराष्ट्र राज्य टीचर ग्रुप चे संस्थापक तथा ॲडमीन व मुक्त पत्रकार सुवर्णकार यांनी पाठिंबा दिला असून खाजगी प्राथमिक मुख्याध्यापक पोरांचे पदाधिकारी तथा वेग वर्धीनी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दादाराव दाडगे, सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक गोविंद भुरे, उदगीर येथील जेष्ठ नागरिक शंकरावजी पानगावे, ज्येष्ठ पत्रकार अंबादास अलमखाने व पत्रकार अरविंद पतकी, प्रा.गुट्टे यांच्यासह दत्ता गायकवाड नागोरी जगदीश यांच्या सह समर्थ न्यूज चैनल चे संपादक माधव रोडगे इत्यादी उपस्थित होते.
Previous Post Next Post